Ad will apear here
Next
बालकलाकारांच्या आविष्कारांनी नटलेला ‘मुकुल’

पुणे : बालकलाकारांनी केलेले सुरेल जेंबेवादन, पाच वर्षांच्या चिमुरड्याचे मधुर बासरीवादन... विशेष विद्यार्थीनींनी सादर केलेली शिवस्तुती... आणि या बाल कलाकारांना रसिकांनी दिलेली भरभरून दाद...निमित्त होते बालदिन साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘मुकुल’ या कार्यक्रमाचे.     


कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या कलावर्धिनी नृत्यशाळेतर्फे ‘मुकुल’ या कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड येथील बालशिक्षण सभागृहात करण्यात आले होते. नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील शिष्यांना कलागुण सादर करता यावेत यासाठी कार्यक्रमाचे आयोजन दर वर्षी करण्यात येते. हे या कार्यक्रमाचे चौथे वर्ष होते.


यात अरुंधती पटवर्धन यांच्या शिष्या उन्मेशा बांदल, श्रावणी साने, प्रांजल केदारी, फाल्गुनी ओझा, राधिका कुंटे, रिया आढाव यांनी भरतनाट्यमची प्रस्तुती केली. अमोल निसाळ यांचे शिष्य मैत्रियी भोसले, रुचा महामुनी, शार्दुल काणे, करण देवगांवकर, केदार जोग व आलापिनी निसाळ यांनी गायन सादर केले. सौरभ वर्तक यांचे शिष्य आलाप चौधरी व अभिरा काळे यांनी आपल्या बासरीवादनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

आलाप चौधरी
नेहा मुथीयन यांच्या शिष्या सारा मेहेंदळे, स्वरा कुलकर्णी, अदिती भांबुरकर, गार्गी शास्त्री, सानिका धीडे, तन्वी लिमये, सिया मुथीयन यांनी कथकद्वारे गणेश वंदना सादर केली. शिल्पा दातार यांच्या शिष्या फातिमा शेख, कोमल दुधाने, रिंकीता रणपिसे, गौरी लोंढे व नुसरत मुजावर या विशेष विद्यार्थीनींच्या कथक सादरीकरणाला रसिकांनी विशेष दाद दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली व सागरिका यांनी केले.  


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZVSCG
Similar Posts
पुणेकरांनी अनुभवली मांगल्याची ‘स्वर-प्रभात’ पुणे : नुकतीच सुरू झालेली थंडी... सभोवताली पसरलेली धुक्याची शाल... अन मंत्रमुग्ध करणारे सनईचे सूर...अशी मंगलमय सकाळ पुणेकरांनी अनुभवली. निमित्त होते पहाटेच्या रागांवर आधारित ‘स्वर प्रभात’ या कार्यक्रमाचे.
‘राजसन्मान’ एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी २३-२४ नोव्हेंबरला पुणे : ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कोथरूड विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राजसन्मान राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका’ स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार, दि. २३ व रविवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी लोकायत सभागृह येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत घेण्यात येणार आहे,’ अशी माहिती
‘सिम्बायोसिस’ने पटकावले ‘एन्थुजिया’चे विजेतेपद पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे (अंडर ग्रॅज्युएट) आयोजित दोन दिवसीय ‘एन्थुजिया’ महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद सिम्बायोसिस महाविद्यालयाने पटकावले.
‘भैरव भवतारक’ नृत्याविष्काराद्वारे नवरसांची अनुभूती पुणे : भक्ती, शक्ती, करुणा, शृंगार, क्रोध अशा विविध भावनांचा मिलाफ असलेल्या ‘भैरव भवतारक’ या अनोख्या नृत्याविष्काराने पुणेकर रसिकांना नवरसांची अनुभूती दिली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने ‘ऋत्विक फाऊंडेशन’ व ‘ऋजुता सोमण कल्चरल अकॅडमी’च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध कथक नृत्यांगना

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language